जीवन म्हणजे काय तर व्यक्तीच्या मनातील सर्व विचार आणि भावनांचा खेळ,🙄 जगी सुखी तोच व्यक्ती जो जगताना घालेन या दोन्हींचा व्यवस्थित मेळ.🙂 🙂🙏🙂🙏🙂 – प्रेमा
दुःख कमी करण्याचे डोळ्यातील पाणी हे एक माध्यम आहे.👍 सुख वाटून घेण्याचे आभाळातील पाणी हे एक साधन आहे.😊 – प्रेमा
व्यक्ती जीवनात घडलेल्या घटनांच्या आठवणी कधीच विसरत नसतो, फक्त त्या आठवणींची तीव्रता काळानुरूप कमी होत जाते. 😊 परिणामी त्या आठवणींशी जोडला गेलेला त्रास पण कमी किंवा नष्ट होतो, आणि तो अधिक संयमी होऊन जीवन व्यथित करतो.🤗 – प्रेमा
चांगल्या गोष्टी आणि लोकांना आपलंसं करणे, वाईट गोष्टी आणि लोकांना इग्नोर करणे हे सुखी आयुष्याचं गणित आहे.😊 आणि हे अवघड गणित आयुष्यात ज्याला जमलं तो जगात सुखी आहे.☺️ – प्रेमा
जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही, तो इतरांवर पण प्रेम करू शकत नाही.😊 जो स्वतःवर प्रेम करू शकतो, तो इतरांवर पण प्रेम करू शकतो.☺️ यामध्ये गुपित एकच आहे की, ती व्यक्ती फक्त आत्मकेंद्री आणि स्वार्थी नसावी.🙏😊 – प्रेमा
वेळेला खूप महत्त्व आहे हे माहिती असूनही मनुष्य कधीच वेळेचा सदउपयोग करत नसतो,😊 स्वतःचा हक्काचा वेळ निघून गेल्यावर मग त्यावर रडत किंवा चर्चा करत बसतो.😀 – प्रेमा
मन मोकळं करण्यासाठी शब्दां सारखा दुसरा कोणी सखा नसतो.😊 आपण व्यक्त होताना त्यांचा आपल्याला ना प्रश्न, ना हट्ट असतो..👍 – प्रेमा
जेंव्हा काहीच करावस वाटत नाही तेंव्हा व्यक्तीने एकांतात असणे छान,😊 मग स्वतः विषयी विचार करताना वेळेचं राहत नाही भान.☺️ – प्रेमा
आपका आज अच्छा है तो कल भी अच्छा हो सकता हैं, आपमे सिर्फ निरंतर कार्य करने की जिद्द होनी चाहिएl 👍☺️ – प्रेमा
मान नेमका कोणाला द्यायचा?🧐 खुर्चीचा अपमान होईल असे वागणाऱ्या व्यक्तीला की, तिचा मान राखणाऱ्या व्यक्तीला?🤔 खुर्चीचा गैरवापर करून स्वतःचे पंटर पुढे आणणाऱ्या व्यक्तीला की, कामाचे मोजमाप प्रामाणिकपणे करणाऱ्या व्यक्तींना?🤔 वरिष्ठांची खोटी स्तुती करून वाह वाह मिळवणाऱ्या व्यक्तीला की, प्रामाणिकपणे काम… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑