मान नेमका कोणाला द्यायचा?🧐
खुर्चीचा अपमान होईल असे वागणाऱ्या व्यक्तीला की, तिचा मान राखणाऱ्या व्यक्तीला?🤔
खुर्चीचा गैरवापर करून स्वतःचे पंटर पुढे आणणाऱ्या व्यक्तीला
की, कामाचे मोजमाप प्रामाणिकपणे करणाऱ्या व्यक्तींना?🤔
वरिष्ठांची खोटी स्तुती करून वाह वाह मिळवणाऱ्या व्यक्तीला
की, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला?🤔
खुर्चीच्या आधाराने पार्ट्या मिळवून पदे वाटणाऱ्या व्यक्तीला
की, कामाला महत्त्व देऊन पद देणाऱ्या व्यक्तीला?🤔
चेले, चमचे गोळा करून स्वतःची खोटी स्तुती करून घेणाऱ्या व्यक्तीला
की, कामाचा खरा मानकरी असणाऱ्या व्यक्तीला?🤔
बोलेल त्या उलट वागेल अशा व्यक्तीला
की, स्वतःच्या बोलण्यावर ठाम राहणाऱ्या व्यक्तीला?🤔
हम करेसो कायदा म्हणणाऱ्या व्यक्तीला
की, सर्व बाबतीत सर्वांना समानतेची वागणूक देणाऱ्या व्यक्तीला?🤔
जवळ काही नसताना खोटा माज दाखवणाऱ्या व्यक्तीला
की, सर्व काही असून माणुसकी जपणाऱ्या व्यक्तीला?🤔
– प्रेमा