कामाच्या गोंधळात, धकाधकीच्या जीवनात

एक कविता करेन म्हणून वर्ष सरले; पण कविता काही तयार झालीच नाही. II१II

कामाच्या ओझ्यात, धावपळीच्या जीवनात एक कविता करेन म्हणून महिने सरले; पण कविता काही तयार झालीच नाही. II२II

कामाच्या कचाट्यात, धडपडीच्या जीवनात एक कविता करेन म्हणून तास सरले; पण कविता काही तयार झालीच नाही. II३II

कामाच्या ताणात, लगबगीच्या जीवनात एक कविता करेन म्हणून मिनिट सरले; पण कविता काही तयार झालीच नाही. II४II

प्रतिलिपीच्या वेळेत, शांतीच्या वेळेत एक कविता करेन म्हणून काही सेकंद सरले आणि आश्चर्य कविता लगेच तयार झाली. II५II

– प्रेमा