तीन वर्षापूर्वी आजच्या दिवशी तुझ्या रूपाने सोनचाफा आमच्या जीवनी आला,

तुझ्या येण्याने पै कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला.🥰

तुझ्या साऱ्या बाललीलांनी घराचं नंदनवन केलं,

तुझ्या खळखळून हसण्याने आसमंत दणाणून गेलं.🥰

 

तुझ्या सोबतच आई-बाबा म्हणून आमचा विकास झाला,

तुझ्या असण्याने आमच्या जीवनाला नवा रंग आला.🥰

 

तुझ्या त्या लडिवाळ, बोबड्या बोलाने आयुष्यातील शीण छुमंतर झाला,

तुझ्या रोज मिळणाऱ्या प्रेमळ मिठीने नव चैतन्याचा झरा वाहू लागला.🥰

 

तुझं आई आई करत मागे मागे फिरणं मनाला स्पर्शून गेलं,

हळूच उद्योग करून नौटंकीबाज हसणं हे सारं काही आता सवयीचं झालं.🥰

 

तुझा चेहरा पाहून दिवसाची गोड सुरुवात होणं आमच्या भाळी आलं,

बाळा तुझ्या जन्माने आमच्या जीवनाचं सार्थक झालं.🥰

 

सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, चांगले आरोग्य, माणुसकी तुझ्या जीवनात कायम बहरत रहावी ही सदिच्छा,🥰

माझ्या ससूल्याला वाढदिवसाच्या प्रेमळ आभाळभर शुभेच्छा..🎂

🎁🎊🎉💐

– प्रेमा