भावा बहिणींच्या पवित्र नात्याची वाट लावू नकोस,
उगाच चुकीचे वागून स्वतःचा तमाशा पाहू नकोस.😊
चार दिन की जवानीसाठी लाचार होऊ नकोस,
भावनेच्या भरात स्वत्व पनाला लावू नकोस.😊
आज होईल ज्यांच्याकडून तुझ्या हुस्नाची वाह वाह,
उद्या तेच करतील तुझ्या अस्तित्वाचा कचरा पहा.😊
उगाच सौंदर्याचा बाजार करून तोल ढळू देऊ नकोस,
चार दिवसाच्या सुखापायी कमावलेले नाव गमावू नकोस.😊
नको ते सांगून सगळ्यांकडून सहानुभूती मिळवू नकोस,
तुझे भले करणाऱ्यांना विनाकारण बदनाम करु नकोस.😊
दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून स्वतः खुश राहू शकणार नाहीस,
जगाला फसवशील पण स्वतःच्या मनाला फसवू शकणार नाहीस.😊
कोणाचे पहिले प्रेम असे खोट्या नात्याने ओरबाडून घेऊ नकोस,
तुझ्यावर विश्वास ठेवल्याचा असा इनाम तू त्यांना देऊ नकोस.😊
एक लक्षात ठेव आपण जे काही पेरू ते इथेच उगवणार आहे,
आपण केलेल्या कर्माचे फळ आज न उद्या इथेच मिळणार आहे.😊
– प्रेमा
January 9, 2022 at 5:20 am
Khooopach chhaann 👍👍👍
“एक लक्षात ठेव आपण जे काही पेरू ते इथेच उगवणार आहे,
आपण केलेल्या कर्माचे फळ आज न उद्या इथेच मिळणार आहे.“
हे एकदम पर्फेक्ट 👍👍👍
January 9, 2022 at 5:29 am
धन्यवाद दादा.🙏😊
January 9, 2022 at 6:12 am
Bahut hi satik likha hai!!!!!
January 9, 2022 at 5:26 pm
Hmm.
Thanks!🙏😊