धर्म द्वेष दाखवत आपण नकळत आपले सहकारी, मित्र, शेजारी यांच्या पासून दूर जात आहोत हे लक्षात पण येत नसेल तर आपल्या सो कॉल्ड पदवीला काहीही अर्थ नाही. बऱ्याच वेळेस पाहते एखाद्या धर्माचे नाव ऐकले तरी काही लोकांचे विनाकारण पित्त खवळताना दिसते. नकळत आपण आपल्याच मदतीला धावून येणाऱ्या लोकांच्या मनातून उतरत नाही ना हे तपासून पाहण्याची गरज आहे. कोणताच धर्म दुसऱ्या धर्माचा तिरस्कारक करण्यास शिकवत नाही. सर्व धर्म समभाव याचा अर्थ ‘आपल्या धर्माचा उदो उदो करून दुसऱ्या धर्माला नावे ठेवण्यासाठी जन्म आपला’ असा नव्हे. समाजकार्यात अशा गोष्टींना जागा देणे अजिबातच अपेक्षित नाही मित्रांनो.

🙏🙏🙏🙏🙏                                -प्रेमा