त्याचा शांत स्वभाव तुला भावाला,
म्हणून तो तुला मनापासून आवडला.
पाच वर्षांपूर्वी तुम्ही एकमेकांना भेटला,
आणि मनोमन विनाअट एकमेकांना पटला.
तुमच्या या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले,
आणि वत्सल नावाचे गोड फुल अवतरले.
तू त्याच्या आणि तो तुझ्या मनात भरला,
म्हणून तुम्ही दोघेही एकमेकांना सावरला.
असेच कायम एकमेकांना आवडत रहा,
येणाऱ्या संकटापासून स्वतःला सावरत रहा.
नेहमी अशीच खुश राहुदे तुमची ही जोडी,
वैशाली तू शिवला समजून घेत जा थोडी.
पूर्ण होवो तुम्हा दोघांच्या मनीच्या इच्छा!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
– प्रेमा
Leave a Reply