(सत्य घटनेवर आधारित कविता)

कोरोनामुळे दुरावलेल्या जिवलगाला
भेटण्यासाठी तळमळणारी ती एक हरीण.

प्रवास एवढा सोपा नव्हता हे जाणून ही त्याला भेटण्यासाठी सतत धडपडत करणारी ती एक हरीण.

दोन डोस पूर्ण झाले म्हणून तिकीट मिळाले
याचा आनंद साजरा करणारी ती एक हरीण.

भेटीचे दिवस जवळ आले तेंव्हाच नेमकी आजारी पडल्यामुळे
सजनाकडे जाता येईल ही सतत चिंता करणारी ती एक हरीण.

साथीदाराला भेटण्यासाठी सगळे उद्योग करून लवकर आजारातून बरी होणारी ती एक हरीण.

कोरोनाची लस घेऊनही अँटीबॉडीज टेस्ट निगेटिव्ह आल्याने परदेशात कोरेंटाईन होणारी ती एक हरीण.

कोरेंटाईनमुळे परदेशातही अंतराने सजनाच्या
खूप जवळ असूनही दूर असणारी ती एक हरीण.

कधी एकदाची सजनाची भेट होईल आणि स्वतःच घर पाहीन या काळजीत असणारी ती एक हरीण.

शेवटी अनेक मैलांचा प्रवास पूर्ण करून
सर्व समस्यांना मागे टाकणारी ती एक हरीण.

कित्येक महिन्यांनी स्वतःचे घर आणि साथीदाराचा आनंदी चेहरा पाहून खुश होणारी ती एक हरीण.

प्रेमामध्ये वय किती? याचा फरक पडत नाही
हे या प्रवासातून दाखवून देणारी ती एक हरीण.

शेवटी भेट झाली म्हणून सजनाच्या हळूच मिठीत शिरून जगाचे भान विसरणारी ती एक हरीण.
– प्रेमा