हिरवागार निसर्ग आणि त्याची शुद्ध हवा,
असा अनुभव वेळ मिळेल तेंव्हा घ्यावा.

येथील हिरवळ पाहून मन प्रसन्न होते,
रंगी बेरंगी फुलांचे दर्शन मनाला उभारी देते.

अनमोल आहे निसर्गातील हा विविधतेचा ठेवा,
निसर्गाचे संवर्धन करणे तुझ्याच हाती रे मानवा.

प्राणी पक्षी आनंदाने बागडताना पाहून,
माणूस जाई या निसर्ग सौंदर्यात हरवून.

फक्त मानवासाठी नाही पृथ्वी ही सगळी,
जपली गेली पाहिजे निसर्गाची अन्न साखळी.

ओला व कोरडा दुष्काळ देऊन निसर्ग मानवास समजावी,
माणसाच्या चुकीची शिक्षा मुक्या जीवांनी का भोगावी?

निसर्ग कोपला म्हणत नको करू तू त्रागा,
निसर्ग नियम पाळण्यासाठी आता हो तू जागा.
– प्रेमा