त्याच त्या गोष्टी
तेच ते राजकारण
परत तेच सर्व,
टोळीच्या म्होरक्याने
परत आणलयं
चमचे लोकांचे पर्व.
या कुचकट लोकांचा हात
धरू शकणार नाही कोणी
कुटाळक्या करण्यात,
पहिला नंबर मारतील
कुठून तरी शोधून आणलेले
उसने तत्वज्ञान झाडण्यात.
समोर गोड बोलून
मागे काड्या करणे
अशा व्यक्तींचा धंदा,
माणुसकी सोडून
कोणताही थर गाठतील
मिळवण्यासाठी रुपया बंदा.
मी नाही त्यातली
कडी लावा आतली
असे या लोकांचे तत्व,
सोज्वळ असल्याचा
कितीही आव आणला तरी
लपत नाही असे व्यक्तिमत्त्व.
रडून पडुन सहानुभूती
मिळवून तुम्ही केलेले कर्म
जगापासून नाही लपणार,
तुमच्या घाणेरड्या राजकारणामुळे
सरळ लोकांना झालेल्या त्रासाचे
फळ तुम्हाला आयुष्यात नक्की मिळणार.
शेवटी सोबत येणार
तुमच्यातील माणुसकी
आणि प्रामाणिकपणा,
सज्जनहो पुढेपुढे करून
चार पैसे कमावण्यापेक्षा
जपा स्वतःतील सच्चेपणा.
– प्रेमा
October 8, 2021 at 4:59 pm
Wwwaahhh wwwaahhh… Kyaa baat hai…. अगदी सगळ्यांच्या मनातली भावना बोलून दाखवलीयस तू … 👍👍👍
October 8, 2021 at 4:59 pm
धन्यवाद दादा.🙏😊
October 8, 2021 at 5:07 pm
अगदी खर आहे ग…तोंडावर नाव ठेवतात आणि त्यांनाच वाचवायला सगळ्यात पुढे असतात…शेवटी काय स्वभावाला औषध नाही…कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच…
October 8, 2021 at 5:16 pm
धन्यवाद!🙏
October 8, 2021 at 8:46 pm
खरं आहे 🌷🌷🌷🌷
विदारक सत्य
October 10, 2021 at 10:01 am
धन्यवाद!🙏
October 9, 2021 at 9:35 am
नेमक्या शब्दात सर्व सार मांडल
October 10, 2021 at 10:02 am
धन्यवाद!🙏😊
October 9, 2021 at 12:04 pm
Abhi isika naam zindagi hai. Apan ek samaj mhanun khup khalchi pauri gathli ahe. Katu ssla tari satya ahe. Khup Sundar vyakt zhalis. Apla pramanik pana asach jap bala
October 10, 2021 at 10:02 am
हो ताई.😊
धन्यवाद!🙏