मुलगा व्हावा म्हणून अनेक
नवस करणारे पाहिले आहेत;
पण मुलीला समानतेने
वागवणारे खूप कमी आहेत.
मुलगी असते हास्याची खाण,
ती असते कुटुंबाची शान.
ती ठेवते तुमचा मान..
ती असली की सगळीकडे चिवचिवाट,
ती असली की घरात घमघमाट.
ती असली की आयुष्यात भरभराट..
मुलगी असते चमकता तारा,
ती असते प्रेमाचा मधुर झरा.
ती असते अनमोल हिरा..
ती देते नवीन विचार,
ती शिकवते आचार.
ती करते तुमचा चांगला प्रचार..
ती नेहमी जपते स्वाभिमान,
तिला असतो घरच्यांचा अभिमान.
ती होऊ देत नाही कधी तुमचा अपमान..
तिच्यासाठी नका करू नवस,
आठवणीने जपा तिची हौस.
बघा तुमच्या जीवनात पडेल आनंदाचा पाऊस..
टिपा तिच्या जीवनातील आनंद क्षणोक्षणी,
ती आजन्म तुमची राहीन ऋणी.
तुमच्या शिवाय तिचे आहे तरी दुसरे कोणी?
मुलासाठी करता कितीतरी अटापिटा,
मुलगी कधीही देणार नाही तुम्हाला फाटा.
सज्जनहो मुलीसाठी उचला थोडा पुण्याचा वाटा..
– प्रेमा
October 5, 2021 at 5:36 am
मस्तच
October 5, 2021 at 5:41 am
धन्यवाद!🙏😊
October 5, 2021 at 5:36 am
बेटी खरोखर धनाची पेटीच असते
अजूनही समाजाची मानसिकता बदलली नाहीये. मूली जितक्या प्रेमाने सांभाळ करतात ,काळजी घेतात,प्रेम करतात तीतकं कोणीच नाही करू शकत. छान प्रेमा
October 5, 2021 at 5:40 am
हो ना ताई.
धन्यवाद!🙏😊
October 5, 2021 at 5:44 am
,,तू माझ्या मनातली व्यथा मांडली. आम्हाला तर मुलगीच हवी होती म्हणून की काय मला दोन मुलं झाली. एक म्हण आहे की सून मुलगा नेते आणि बेटी जावयी आणते. पण मी ठरवलं आहे के जेव्हा केव्हा माझ्या सूना घरी येतील त्या माझ्या मुलीचं असतील. जी माया मुली करतात ती मुलं कधीच करू शकत नाही.
October 5, 2021 at 5:47 am
खूप छान मांडणी केली ताई.
मनापासुन धन्यवाद!🙏😊
October 5, 2021 at 5:47 am
वाहहहह वाहहहह खूपच छान विचार… 👍👍👍
October 5, 2021 at 7:35 am
धन्यवाद दादा.🙏😊