मैलो दूर असूनही मनाने तुझाच
विचार करणारी बहिणीची वेडी ही माया
दीर्घ आयुष्य लाभू दे माझ्या भाऊराया.🙏
तू आयुष्यात खूप मोठा होऊ दे
मागणीसाठी देवापुढे झिझवते ही काया
दीर्घ आयुष्य लाभू दे माझ्या भाऊराया.☺️
सुख दुःखात पाठीशी कायम उभा राहणारा
तू माहेरची मोठी रे प्रेमळ छाया
दीर्घ आयुष्य लाभू दे माझ्या भाऊराया.🙏
याची देही याची डोळा आता
तुझा सुखाचा संसार मिळू दे पहाया
दीर्घ आयुष्य लाभू दे माझ्या भाऊराया.☺️
खूप कष्टाने चांगली माणसे कमावली
तुझे हे कष्ट कधीच जाऊ नये वाया
दीर्घ आयुष्य लाभू दे माझ्या भाऊराया.🙏
तुझ्या आयुष्यातील सर्व सुखकारक
गोष्टींची प्रगती पदोपदी मिळो ऐकाया
दीर्घ आयुष्य लाभू दे माझ्या भाऊराया.☺️
– प्रेमा
April 26, 2022 at 3:05 am
प्रत्येक बहिणीची सदिच्छा. प्रेम. सगळ्या भावासाठी
April 26, 2022 at 3:20 am
धन्यवाद ताई.🙏😊
April 26, 2022 at 4:42 am
वाहहह बैना… खूपच छान…. 👍👍👍👍
April 27, 2022 at 3:28 am
धन्यवाद दादा.🙏😊