दुःख नसते तर सुखाची किंमत कळली नसती,
सुख नसते तर दुःखाचे महत्त्व पटले नसते.
सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू,
त्यांना तोलण्यासाठी अजुन तयार नाही झाला तराजू.

सुख तुम्हाला आतून बाहेरून आनंदी करतं,
दुःख तुम्हाला समस्यांशी दोन हात करण्याची संधी देतं.
सुख असो वा दुःख मानवी जीवनात जास्त वेळ टिकत नाही,
ज्याने दोन्हींचा समतोल साधला त्याचा सारखा सुखी कोणी नाही.

सुखाला डोक्यावर न घेता सहज हाताळता आलं पाहिजे,
दुःखाचा बाऊ न करता त्याची गळाभेट घेतली पाहिजे.
सुख आणि दुःख म्हणजे भावनांच्या दोन छटा,
जगात असा कोणी राहिला नसेल त्यांना न भेटता.

सुख तुम्हाला जीवनातील आनंद लुटायला शिकवतं,
दुःख तुम्हाला जीवनातील सहनशीलतेचे धडे देतं.
सुख दुःख जीवनात उन्ह सावली प्रमाणे लपंडाव खेळणारे आहे,
दोहोंचा समतोल साधून आनंदी रहा हे प्रेमाचे सांगणे आहे.
– प्रेमा