सर्व स्तरांवर होणाऱ्या धावपळीमुळे स्वतः शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या थकत आहे, स्वतःचा थोडा विचार करशील का?🤔

घरची दारची वेळ जुळवाजुळव करण्यामध्ये स्वतःचा अवतार होत आहे, स्वतःचा थोडा विचार करशील का?🤔

पालकाची भूमिका जबाबदारपणे पार पाडताना स्वतःची हेळसांड होत आहे, स्वतःचा थोडा विचार करशील का?🤔

सगळ्यांचा विचार करून मन तीळ तीळ तुटून शरीर खराब होत आहे, स्वतःचा थोडा विचार करशील का?🤔

सर्व नाती टिकवण्यासाठी स्वतःला तारेवरची कसरत करावी लागत आहे, स्वतःचा थोडा विचार करशील का?🤔

माणुसकी जपण्याचा ठेका आपणच घ्यायचा म्हणून स्वतःची दगदग होत आहे, स्वतःचा थोडा विचार करशील का?🤔

– प्रेमा