पुस्तके हसवतात पुस्तके रडवतात

पुस्तके माणसाचे जीवन घडवतात

 

पुस्तके जीवनाला दिशा देतात

जगण्याची नवीन आशा देतात

 

सुखात पुस्तके हे मार्गदर्शक असतात

तर दुःखात हेच पुस्तके सोबती असतात

 

मानवी वयाचे बंधन ते पाळत नसतात

सदा सर्वकाळ ते माणसाचे सोबती असतात

 

त्यांना अलगद हाताळणे हे आपलं काम असतं

ज्याने लिहिलं त्याचं शेवट पर्यंत त्यावर नाम असतं

– प्रेमा