कामाच्या नादात तुला घराचा विसर पडतो,
तुझा हा स्वभाव तर महत्त्वाच्या नात्यामध्ये नडतो.
किती करशील रे सारखं काम काम?
त्या वेड्या जीवाला दे रे कधीतरी आराम.
तुझी ही धावपळ बघून आमचा जीव कासावीस होतो,
कामाच्या आहारी जाऊन तू वेळेवर काही न खातो.
कामासाठी दिवस रात्र जागून किती करशील जीवाचे हाल?
कामाचं थोडं वेड कमी करून स्व:ताकडे थोडं लक्ष घाल.
काम करून करून शरीर आणि मन दोन्हीही थकतं,
अधून मधून त्रास देऊन अस्तित्वाची जाणीवही करून देतं.
कामाच्या या वेडा पासून कधी होशील तू रे थोडा लांब?
आता तरी शरीर आणि मनाचा विचार करून विश्रांतीसाठी थोडा थांब.
जीवन जगण्यासाठी काम करणे महत्त्वाचे हे सगळ्यांना मान्य,
कामामुळे घराकडे दुर्लक्ष होणे कधीही नसतं सामान्य.
घर आणि काम दोन्ही वेगळे ठेवण्याचे आधीचे दिवस येतील का रे परत कधी?
आपल्या लोकांमध्ये जास्त वेळ घालवण्याची लवकरच येवो ती संधी.
– प्रेमा
September 7, 2021 at 9:01 am
Wwwaahhh wwwaahhh wwwaahhh…
Khooopach chhaann 👍👍👍
September 7, 2021 at 9:57 am
धन्यवाद दादा.🙏😊
September 7, 2021 at 2:19 pm
👍👍👍
September 7, 2021 at 9:06 am
Perfecccct ekdam. खरय कामापुढे काहीच सुचत नाही. जीवनातले छोटे आनंदी क्षण पण ऊपभोगता येत नाही कीत्येकांना
September 7, 2021 at 9:58 am
हो ना ताई.
धन्यवाद!🙏😊
September 7, 2021 at 11:20 am
वा…वा…
छान छान 🌷🌷🌷🌷
September 7, 2021 at 12:25 pm
धन्यवाद सर.🙏😊
September 7, 2021 at 1:32 pm
प्रेमा आजच्या या जगात माणूस वेड्यासारखा धावतो आहे एक स्वप्न पूर्ण झालं की दुसरं, दुसरे झाले की तिसरा. हे काही आयुष्य नाही आपल्याला हे समजायला हवं की घरची माणसं आणि घरात घालवलेला वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. बरेच वेळा असं होत की हे समजेपर्यंत खूप उशीर होऊन गेलेला असतो. तुझ अगदी बरोबर आहे आपल्याला काम आणि घर या दोन गोष्टी वेगळ्या आणि equally महत्त्वाच्या आहेत हे समजलं तर आयुष्य सुंदर होता.
September 7, 2021 at 1:42 pm
हो ताई.
धन्यवाद!🙏😊
September 7, 2021 at 2:20 pm
अगदी खरंय अल्पना👍👍👍
September 8, 2021 at 1:16 am
छान छान
जिजु बाबतीत तक्रार तर नाही न 🤔😂😂
काम न काम
मस्त आहे कविता
लेखन 📝 😎छान👍
September 8, 2021 at 4:22 am
तक्रार नाही पण प्रेरणास्थान जिजुच आहेत.😂
September 8, 2021 at 1:24 am
छान छान
मस्त लेखन 👍
September 8, 2021 at 4:22 am
धन्यवाद डियर.🙏😊