बालपणापासून ऐकलेल्या गोष्टी मनात पिंगा घालत होत्या,

श्री रामाची महिमा मनोमन ऐकुन मनात घर करत होत्या.🙏

कोणी म्हणे रामायण म्हणजे खोटे तर कोणी म्हणे भाकड कथा,

राम खरा असल्याचा अयोध्या संशोधनात लागला पत्ता.🙏

जरी रामायणावर कोणी किती ही घेतली शंका,

तरी सदा सर्वकाळ वाजत राहील त्यांच्या महतीचा डंका.🙏

राम प्रत्येकाच्या ह्रदयात वसला आहे हेच माना सत्य,

मनोमन त्याला स्मरून त्याची भेट घ्या नित्य.🙏

समाजात जाती धर्माच्या नावाने तेढ निर्माण करून नष्ट करू नका साम्राज्य,

भोळ्या जनतेची एकच आशा की पुन्हा एकदा येवो रामराज्य.🙏

– प्रेमा