सोड हे अहंकाराचे आवरण
कधी माणूस होऊन तर बघ
हे जग तुला तुझेच भासेल
कधी मनमोकळे जगून तर बघ.🤗

सोड हे लोभाचे आवरण
कधी साधं जगून तर बघ
हे जग तुला प्रेमळ भासेल
कधी निस्वार्थी प्रेम करून तर बघ.🤗

सोड हे स्वार्थाचे आवरण
कधी प्रेमात पडून तर बघ
हे जग तुला सप्तरंगी भासेल
कधी यात न्हाऊन तर बघ.🤗

सोड हे दुःखाचे आवरण
कधी सुखात न्हाऊन तर बघ
हे जग तुला आनंदी भासेल
कधी लहाना सारखे बागडून तर बघ.🤗

सोड हे पोक्तपणाचे आवरण
कधी लहान होऊन तर बघ
हे जग तुला मित्रा सारखे भासेल
कधी जवळ येऊन तर बघ.🤗

सोड हे द्वंद्व विचारांचे आवरण
कधी सुखाला जवळ घेऊन तर बघ
हे जग तुला स्वर्ग भासेल
कधी त्यात सामावून तर बघ.🤗
– प्रेमा