तू आणि मी लहानपणापासून एकत्र वाढलो,

तू आणि मी शाळा-कॉलेज जीवनात एकत्र घडलो.☺️

गटात गप्पा गोष्टी, टवाळक्या करता करता,

एकमेकांत गुंतलो मनाला सावरता सावरता.🥰

सततच्या सहवासाने हळूहळू आधी एकमेकांना जाणलो,

मैत्रीच्या नात्याने सुरुवात होऊन नंतर जीवनसाथी बनलो.🤗

चौतीस वर्षाच्या लग्नबंधना नंतरही तू माझ्यासाठी तोच आहेस,

आणि मी तुझ्यासाठी पहिली होती तीच आणि तशीच आहे.😍

तू माझ्यापासून दूर असूनही मनाने सतत जवळ आहेस,

माझ्या मनाची तगमग जाणणारा तू माझा हिरो आहेस.😊

तुझी माझी जोडी अशीच हसत खेळत राहू दे,

तुझ्या सोबतीने लग्नाच्या वाढदिवसाची शंभरी होऊ दे.🤩

– प्रेमा