तुमच्या वाचनाचे वेड आम्ही नेहमी अनुभवतो,
गप्पांत तुमच्यातील वाचक वेळोवेळी जाणवतो.🥰

तुम्हाला राजकारणाची भारी आवड,
त्यावर घरात रंगे आपला गप्पांचा फड.😀

स्वयंपाकात तुम्ही आहात खूप पारंगत,
चविष्ट जेवणाची घरात रंगते छान पंगत.😋

तुमच्या चांगल्या स्वभावत येत नाही कोणतीच बाधा,
तुम्ही आहात आमचे स्वभावाने गोड आणि मायाळू दादा.🤗

आमच्या खाण्या पिण्याची काळजी घेता अगदी योग्य,
तुमच्या सारखा काळजीवाहू दादा मिळणे आमचे भाग्य.🤩

तुमच्यातील साधे भोळेपणा मनाला भावतो,
तुमच्या सहवासात राहून आम्ही धन्य पावतो.☺️

तुमची प्रेमळ साथ आम्हाला अशीच नेहमी लाभू दे,
ईश्वर चरणी प्रार्थना आमचे दादा दीर्घायुषी होऊ दे.😍

पूर्ण होवो तुमच्या मनातील सर्व आकांक्षा व इच्छा,
प्रिय दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉🎊
– प्रेमा.