सुखात नाही पण दुःखात धावून
येणारी अशी तुझी माझी मायाळू मैत्री.🥰
संकट काळात खंबीरपणे पाठीशी उभा
राहणारी अशी तूझी माझी धाडशी मैत्री.🥰
मैत्रीतील सर्व गुपिते अलगद
जपणारी अशी तुझी माझी विश्वासू मैत्री.🥰
गैरसमजाला कसलाच थारा न
देणारी अशी तुझी माझी घट्ट मैत्री.🥰
भावनीक होताच हक्काचा खांदा
देणारी अशी तुझी माझी प्रेमळ मैत्री.🥰
अनेक किस्से सांगून हसून हसून पुरेवाट
लावणारी अशी तुझी माझी गंमतीदार मैत्री.🥰
विविध गोष्टींवर वाद-विवाद होऊन पण संवाद न
थांबणारी अशी तुझी माझी वैचारिक मैत्री.🥰
मैत्री धर्म निभवण्याचा उत्तम आदर्श
शिकवणारी अशी तुझी माझी निखळ मैत्री.🥰
– प्रेमा
May 7, 2022 at 3:58 am
अशी मैत्री मिळणं खूप कमी लोकांच्या भाग्यात असतं… 👍👍👍
May 8, 2022 at 4:42 am
खरंय.
धन्यवाद दादा.🙏😊
May 7, 2022 at 4:19 am
You are lucky. Ashi ektari maitri havi.
May 8, 2022 at 4:43 am
Yes.
Thank you Tai.🙏😊
May 8, 2022 at 2:15 am
💕 Superb
May 8, 2022 at 4:43 am
Thank you.🙏😊