निम्मे वय झाले तरी तिला आपलं बाळ हे अजुन
लहानचं आहे असे वाटते ती म्हणजे आई.🤗
आपल्या पिल्लांना त्रास होऊ नये म्हणून
सर्व संकट परतवू पाहणारी ती म्हणजे आई.🤗
बाळाला थोडा जरी त्रास झाला तरी स्वतः रडून
रडून रात्र जागून काढणारी ती म्हणजे आई.🤗
लेकरू उपाशी राहू नये म्हणून आजारपणातही
उठून स्वयंपाक करणारी ती म्हणजे आई.🤗
मुलांच्या भविष्यासाठी पै पै गोळा करून स्वतःच्या
पोटाला चिमटा काढणारी ती म्हणजे आई.🤗
बाळाच्या सुखासाठी दिवस रात्र एक करून
सर्वतोपरी धडपडणारी ती म्हणजे आई.🤗
हजार चुका केल्या तरी त्याचा बोभाटा न करता
आपल्या पोटात घालून घेणारी ती म्हणजे आई.🤗
लेकराच्या चेहऱ्यावर कायम हसू पाहण्यासाठी
जगाशी लढण्यासाठी तयार राहणारी ती म्हणजे आई.🤗
वयाने कितीही मोठे झालात तरी शेवट पर्यंत सोबत
असावी असे वाटणारी व्यक्ती ती म्हणजे आई.🤗
जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी
फक्त नावचं बास असते ती म्हणजे आई.🤗
– प्रेमा
May 8, 2022 at 5:09 am
अप्रतिम प्रेमा ताई ❤️❤️❤️❤️ तुमच्या सगळ्या कविता मला फार आवडतात 👌👌👌👌 सुंदर
May 8, 2022 at 6:28 am
मनापासुन धन्यवाद ताई.🙏😊
May 8, 2022 at 5:39 am
So beautiful composition….
Congratulations 🎉
May 8, 2022 at 6:28 am
Thank you so much Sir.🙏😊
May 8, 2022 at 5:59 am
Beautiful 💗💗💗
May 8, 2022 at 6:29 am
Thank you Tai.🙏😊
May 9, 2022 at 2:49 am
अप्रतिम 💕 कविता… 🙏🏻 आई 🙏🏻🙏🏻🙏🏻
May 9, 2022 at 8:36 am
धन्यवाद.🙏😊