माझ्या आनंदासाठी जगण्यात
सतत नावीन्य शोधणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗
मी बोर झाले की लाँग ड्राईव्हला
घेऊन जाऊन निसर्गात फिरवणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗
मस्त मस्त पदार्थ बनवून बळजबरी
खाऊ घालून मला मोटी बनवणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗
माझ्या डोळ्यातील पाणी
पाहून स्वतः अस्वस्थ होणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗
मला सुखात ठेवण्यासाठी
दिवसरात्र काबाडकष्ट करणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗
शांत बसण्यावरू माझ्या
मनातील हालचाली ओळखणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗
आयुष्याच्या धावपळीत
माझी आवड निवड जपणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗
प्रत्येक वेळी नवीन रूप दाखवून
परत परत प्रेमात पाडणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗
– प्रेमा
May 9, 2022 at 9:32 am
Ek dum badhiya! Ashya jodidarala jap!!
May 11, 2022 at 3:19 am
Thank you Tai.🙏😊
May 9, 2022 at 12:20 pm
असा जोडीदार मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे…
खूप छान 👍👍👍
May 11, 2022 at 3:19 am
धन्यवाद दादा.🙏😊
May 9, 2022 at 12:28 pm
💕 नशीबवान आहे 💕💕 You and He also
May 11, 2022 at 3:19 am
Thank you.🙏😊
May 18, 2022 at 8:47 am
तूमच्या सारखा जोडीदार हा सर्वांना मिळो
अप्रतिम कविता
May 18, 2022 at 11:01 am
धन्यवाद!🙏😊