माझ्या आनंदासाठी जगण्यात
सतत नावीन्य शोधणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗

मी बोर झाले की लाँग ड्राईव्हला
घेऊन जाऊन निसर्गात फिरवणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗

मस्त मस्त पदार्थ बनवून बळजबरी
खाऊ घालून मला मोटी बनवणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗

माझ्या डोळ्यातील पाणी
पाहून स्वतः अस्वस्थ होणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗

मला सुखात ठेवण्यासाठी
दिवसरात्र काबाडकष्ट करणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗

शांत बसण्यावरू माझ्या
मनातील हालचाली ओळखणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗

आयुष्याच्या धावपळीत
माझी आवड निवड जपणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗

प्रत्येक वेळी नवीन रूप दाखवून
परत परत प्रेमात पाडणारा
तू माझा लाडका जोडीदार.🤗
– प्रेमा