वाईट लोकांच्या संगतीला लागून
आपला संसार उद्ध्वस्त होत असेल
तर यात नेमकी चूक कोणाची?🤔
आपल्या करणीची फळं घरच्या लोकांना
हकनाक भोगावे लागत असतील
तर यात नेमकी चूक कोणाची?🤔
आपली चूक दाखवणाऱ्याला दुर्लक्षित
करून पायावर दगड पाडून घेत असेल
तर यात नेमकी चूक कोणाची?🤔
आपल्याजवळ असणारे ढीगभर ज्ञान बाजूला
ठेवून कुरघोडी करण्यात वेळ घालवत असू
तर यात नेमकी चूक कोणाची?🤔
आपल्या इगोमुळे समंजस लोकांना
बाजूला सारून स्वार्थी लोकांत रमत असू
तर यात नेमकी चूक कोणाची?🤔
आपल्याच तोऱ्यात वावरत लांडग्याना जवळ
करून प्रामाणिक लोकांना त्रास देत असू
तर यात नेमकी चूक कोणाची?🤔
आपल्या वाईट वागणुकीमुळे कुटुंबाचे
विनाकारण हाल होत असतील
तर यात नेमकी चूक कोणाची?🤔
आपल्या शक्तीचा वापर करून ज्यांना
उचलून धरले तेच जीवावर उठत असतील
तर यात नेमकी चूक कोणाची?🤔
– प्रेमा
May 26, 2022 at 4:02 am
Chuk aplya ego chi
May 26, 2022 at 4:16 am
Right.👍😊
Thank you.🙏
May 26, 2022 at 6:20 am
Khooopach chhaann…. अगदी खरंय 👍👍👍
May 26, 2022 at 4:51 pm
धन्यवाद दादा.🙏😊
May 26, 2022 at 7:30 am
हं. या त्रासात सगळेच भरडले जातात
May 26, 2022 at 4:52 pm
Hmm.
Thank you.