मन प्रसन्न करणारी अशी
माझी उगवती सकाळ तू.😍
मनातून व्यक्त व्हावं असं
माझ्या लिखाणाचे रहस्य तू.😍
मनमुराद आस्वाद घ्यावा अशी
माझ्या आनंदाची खाण तू.😍
तुझ्यात रममाण होऊन जावे असे
माझ्या हास्याचे गुपित तू.😍
भान हरवून तुझ्यात गुंतावे असे
माझ्या जीवनाचे स्पंदन तू.😍
तुला पाहता सर्व विसरावे अशी
मला कवेत घेणारी रात्र तू.😍
– प्रेमा
May 27, 2022 at 5:26 am
अशी किंवा असा तू सर्वांनाच मिळू दे 👍👍👍
May 27, 2022 at 6:08 am
धन्यवाद दादा.🙏😊
May 27, 2022 at 7:13 am
Everyone should be blessed with such a partner.
May 27, 2022 at 7:53 am
Thank you Tai.🙏😊