इथे चमचांचीच चलती
इथे चमचांचीच भरती.🍴
सगळीकडे ढवळाढवळ करती
तरी चमचेच सगळ्यांना भारी वाटती.🍴
सत्य तेच वाटे जे चमचे सांगती
हेच चमचे त्यांना तोंडावर पाडीती.🍴
अडचणीच्या वेळी हेच चमचे माघारी फिरती
तरीही म्होरके नादात चमचेच गोळा करती.🍴
आता म्होरक्यांची पण आहे तीच गती
ते पण कोणाचे तरी चमचे म्हणून मिरवती.🍴
चमचे कधीही कोणाचे नसती
तरी म्होरके त्यांनाच वर आणती.🍴
चमचांचे कितीही लाड केले तरी
गोड बोलून ती म्होरक्यांचीच मारती.🍴
अशा वाईट वृत्तीला अधिकारी खतपाणी घालती
मग का नाही होणार हळू हळू चमच्यांचीच बढती?🍴
– प्रेमा
May 31, 2022 at 4:42 am
Ho pan ata galti lagli ahe na!!! Apan khare pan sodaycha nahi.
May 31, 2022 at 4:51 am
धन्यवाद ताई.
🙏😊
May 31, 2022 at 4:49 am
अगदी बरोबर… 👍👍👍
May 31, 2022 at 4:51 am
धन्यवाद दादा.🙏😊
May 31, 2022 at 5:33 am
फार काळ नाही टिकत चमचेगीरी,
कोणी तरी हवात्यांना कडक अधीकारी
ते दीखावेच करती वरवरी
आपणही सोडू नये सच्चेगीरी….योग्ज
June 1, 2022 at 3:22 am
मस्तच.👍😀
धन्यवाद!🙏😊