पाहून मला तू
हसू नकोस ना
तूझ्या गालावरची
खळी मला वेड लावते.🥺
हसून मला तू
पाहू नकोस ना
तुझ्या गुलाबी ओठांवरचे
हसू मला वेड लावते.🥺
ठुमकत अशी तू
जाऊ नकोस ना
तुझ्या पैजणांची छमछम
मला वेड लावते.🥺
बोलत अशी तू
राहू नकोस ना
तुझ्या आवाजाची
धून मला वेड लावते.🥺
नजरेची मोहिनी अशी
तू घालू नकोस ना
तुझ्या नाजूक डोळ्यांची
हालचाल मला वेड लावते.🥺
मला बघून अशी तू
लाजू नकोस ना
तुझ्या आकर्षित कायाची
लकब मला वेड लावते.🥺
– प्रेमा
June 1, 2022 at 3:53 am
Wah, ek number!!
June 1, 2022 at 9:14 am
Thank you so much.🙏😊
June 1, 2022 at 4:51 am
अरे वाहहहहह…. मस्स्स्स्स्स्स्तच 👍👍👍
June 1, 2022 at 9:14 am
धन्यवाद!🙏😊
June 1, 2022 at 5:33 am
Very much romantic….!
Congratulations 🎉
June 1, 2022 at 9:14 am
Thank you so much.🙏😊
June 10, 2022 at 2:29 pm
मस्तच…👌👌👌
June 16, 2022 at 5:08 am
धन्यवाद!🙏😊