माझ्या मैत्रिणी आज तुझा वाढदिवस

प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा दिवस.🎂

 

तुझ्या स्वभावाचे ना ना पदर

सच्चा व्यक्तीचा तुला खूप आदर.☺️

 

कधी बडबडी तर कधी खूप शांत

प्रामाणिक शिक्षिका हा तुझा प्रांत.🤗

 

वैचारिक गोष्टींवर तुझी भारी पकड

उगाच नडेल त्याची उतरवतेस अकड.😀

 

मदत करताना व्यक्ती ओळखायला शिक

स्वार्थी लोकांना कधीतरी नाही म्हणायला शिक.🙄

 

तुझा आनंदाचा काळ सुरू झाला

स्वार्थी लोकांना थोडा घाल आळा.😊

 

अडचणींना धावून जाणे तुझी माणुसकी

आजूबाजूला आपली म्हणणारी असतात की.🥰

 

पूर्ण होवो तुझ्या मनातील सर्व इच्छा

प्रिय अनिता तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁💐

– प्रेमा