आज तुझा वाढदिवस खडूस

आज तरी नको कोणाशी भांडुस.😂

 

तुझी माझी मैत्री बघ जगा वेगळी

भांडून व्यक्त होण्याची रीत आगळी.😜

 

तुझ्या सारखा मित्र सगळ्यांना मिळू दे

भांडणाचा खरा अर्थ त्यांना पण कळू दे.😀

 

आपल्या मैत्रीला कोणाची नजर न लागो

मैत्रीचं हे वेगळं नातं सर्वांच्या जीवनात विराजो.🤗

 

नेहमी हसत आणि आनंदी रहा

जीवनातील सर्व सुख अनुभवून पहा.☺️

 

पुर्ण होऊ दे तुझ्या मनीच्या इच्छा

प्रिय निलेश तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁💐

– प्रेमा