तुझे आयुष्य यशाने बहरत जावो,
सुखांचा अनुभव पावलोपावली येवो.👏
तुझ्यातील कष्ट आणि जिद्दीला यश मिळो,
हाडाचा समाजकार्यकर्ता समाजाला लवकर कळो.👏
तुझ्यातील मधुर वाणी आणि आदर करण्याचा गुण तुला यशाचे शिखरे दावो,
तुझ्या जीवनातील प्रगतीचा चढता आलेख कानावर येवो.👏
प्रगतीच्या मार्गावरील आडवळणाला तू जिद्दीने सामोरे जावो,
तुझ्यातील माणुसकीचा गुण कायम तुझ्या सोबत राहो.👏
आपली ओळख ऑनलाईन असली तरी तुझ्यातील सच्चेपणा कायम मनाला भावतो,
माणसातील हाच सच्चेपणा जीवनातील प्रगतीत मैलाचा दगड ठरतो.👏
पूर्ण होवो तुझ्या मनातील सर्व इच्छा
प्रिय अक्षय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁🎊🎉💐
– प्रेमा
June 16, 2022 at 5:58 am
अरे वाहहहह… खूपच छान 👍👍👍
June 16, 2022 at 10:11 am
धन्यवाद दादा.🙏😊