माझे सर्व हट्ट पुरवणारी

आणि न कंटाळता,

मला प्रेमाने भरवणारी

माझी आजी होती ती.☺️

 

आडपडदा न ठेवता

सगळं सांगणारी,

माझी पहिली मैत्रीण

माझी आजी होती ती.☺️

 

जे आहे ते समोर

बोलणारी,माझ्या सर्व

गोष्टी गुपित ठेवणारी

माझी आजी होती ती.☺️

 

भयंकर हट्टी आणि

कोणाला न जुमाननारी,

माझे सर्व लाड पुरवणारी

माझी आजी होती ती.☺️

 

घरच्यांवर रागाला येऊन

रुसून बसणारी, तरीही

मला मायेने जवळ घेणारी

माझी आजी होती ती.☺️

 

जिच्या मिठीत नेहमी

सुरक्षित वाटे, अशी

मला जीवापाड जपणारी

माझी आजी होती ती.☺️

 

आपले सर्व दुःख

बाजूला सारत, मला

भरभरुन प्रेम देणारी

माझी आजी होती ती.☺️

 

स्वभावाने साधीभोळी

पण मनाने श्रीमंत,

या प्रेमाची जिवाभावाची

राधा आजी होती ती.☺️

– प्रेमा