तुला नाकारलंय त्यांनी,
न डगमगता जीवनात
स्थाईक होऊन दाखव.😊
तुला कमी लेखलय त्यांनी,
न खचता तू काय आहेस
जगाला सिध्द करून दाखव.☺️
तुझा मजाक उडवलाय त्यांनी,
तू किती समंजस आहेस
कृतीतून व्यक्त होऊन दाखव.😊
तुझा अपमान केलाय त्यांनी,
स्वतःतील शक्ती ओळखून
स्वकर्तुत्वाने मान मिळवून दाखव.😊
तुला संकटात ढकललय त्यांनी,
त्याचे दुःख न करत बसता
समोरील परिस्थितीला भिडून दाखव.😊
तुला त्रास दिलाय त्यांनी,
स्वतः गर्भगळीत न होता
जीवनात आनंदी होऊन दाखव.😊
– प्रेमा
Leave a Reply