तुला सोडून जाणाऱ्या व्यक्तीच्या आठवणीत रडण्या पेक्षा,
तुझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा थोडा विचार करून तर बघ.😊
तुला दूर करणाऱ्या व्यक्तीच्या विरहात जगण्या पेक्षा,
तुला जीव लावणाऱ्या व्यक्तिला थोडा जीव लावून तर बघ.😊
तुझ्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या व्यक्तीच्या आठवणीत झुरण्या पेक्षा,
तुझी सावली बनून राहणाऱ्या व्यक्तीला थोडा वेळ देऊन तर बघ.😊
तुझे मन न जाणणाऱ्या व्यक्तीच्या मागे लागण्या पेक्षा,
तुला मान देणाऱ्या व्यक्तीला थोडी मैत्रीची जागा देऊन तर बघ.😊
तुला लग्नास नकार देणाऱ्या व्यक्तीला जीवनात महान समजण्या पेक्षा,
तुझे जीवन आनंदाने फुलवण्याची तयारी असणाऱ्या व्यक्तीला मनात थोडे स्थान देऊन तर बघ.😊
तुझ्या भावनांना शून्य किंमत देणाऱ्या व्यक्तीच्या भूतकाळात रमण्या पेक्षा,
प्रेमाचा सल्ला की, तुझ्या भावनांना जपणाऱ्या व्यक्तीच्या वर्तमान काळात जगून तरी बघ.😊
– प्रेमा
Leave a Reply