मुलगी आणि मुलीच्या मैत्रिणीला मुली सारखेच वागवणारे तुम्ही एकमेव व्यक्ती राही,
काका तुमच्या सारखे कोणीच निर्मळ मनाचे नाही.😊
मुलगी आणि सून यामध्ये तुम्ही कधीच दूजाभाव करत नाही,
काका तुमच्या सारखे कोणीच निर्मळ मनाचे नाही.😊
मुलगा मुलगी भेद न करता दोघांना समान वागणारे पिता म्हणून आम्ही तुमचा आदर्श घेई,
काका तुमच्या सारखे कोणीच निर्मळ मनाचे नाही.😊
जे विचारात तेच आचरणात ह्या तुमच्या स्वभावामुळे सर्वांच्या मनात आदर निर्माण होई,
काका तुमच्या सारखे कोणीच निर्मळ मनाचे नाही.😊
दिलेला शब्द शंभर टक्के पाळणे आणि त्यास खरे उतरणे ही तुमची वृत्ती तुम्हास मोठ्या उंचीवर नेई,
काका तुमच्या सारखे कोणीच निर्मळ मनाचे नाही.😊
तुमच्या सारखा बाप आणि शंभर नंबरी सोनं लाभणे ही आम्हा सर्वांची गत जन्माची पुण्याई,
काका तुमच्या सारखे कोणीच निर्मळ मनाचे नाही.😊
– प्रेमा
August 15, 2024 at 3:30 pm
मस्त! असे लोक दुर्मिळच असतात!
August 15, 2024 at 3:31 pm
धन्यवाद ताई.🙏😊