आला आला दसरा
प्रेमळ लोकांच्या भेटीने
कटकटी साऱ्या विसरा.☺️
आला आला दसरा
सोन्या चांदीच्या खरेदीने
दारिद्रय सारे विसरा.☺️
आला आला दसरा
घरा दाराच्या सजावटीने
अडचणी साऱ्या विसरा.☺️
आला आला दसरा
आप्तेष्टांच्या आपुलकीने
दुःख सारे विसरा.☺️
आला आला दसरा
गोडधोड भोजनाने
समस्या साऱ्या विसरा.☺️
आला आला दसरा
प्रेम, आनंद, सुख, समृद्धीचा
जीवनात घ्या आसरा.☺️
– प्रेमा
October 7, 2022 at 8:24 am
Dasryachya khup shubhecha!!
October 7, 2022 at 4:34 pm
🙏😊💐