आत्ता पर्यंतचे तुमचे सर्व अनुभव पाहता,
स्वतःला सकारात्मक कामात झोकून देता.😊
क्षेत्रकर्याचे निरीक्षण तुम्ही कलेकलेने करता,
कामातील बारकावे चालता बोलता सहज हेरता.😊
माणसाच्या मनातील भाव तुम्ही अचूक ओळखतात,
ऑफिस बॉय आणि मावशी तुम्हाला खूप मानतात.😊
मित्रांना शक्य तेवढे प्रयत्नाने संकटातून वाचवता,
मैत्रीत दुखावल्या नंतर स्वतःलाच अलिप्त ठेवता.😊
बोलताना चेहऱ्यावर नेहमी हसरे भाव ठेवता,
चुकणाऱ्या जवळच्या लोकांना सांभाळून घेता.😊
संकटकाळी लोकांच्या मदतीला आत्मियतेने धावता,
दिखाव्याचा लवलेशही चेहऱ्यावर न आणता लोकांत वावरता.😊
चेष्टेमध्ये समोरच्याला बरेच काही सांगून जाता,
बोलण्या मागील मूळ उद्देश बरोबर पोहचवता.😊
तुम्ही नेहमी असेच हसत खेळत राहो हीच इच्छा,
शिवाजी सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉🎊
– प्रेमा
October 1, 2022 at 4:51 pm
Wwwaahhh 👍👍👍
खूप छान… अशी व्यक्तिमत्व महान असतात
October 2, 2022 at 6:54 am
धन्यवाद दादा.🙏😊
October 2, 2022 at 11:54 am
Marmik
October 6, 2022 at 4:30 pm
Thank you.🙏😊