गावच्या मातीशी नाळ जोडलेली असणाऱ्या

तुला वेगळी ओळख सांगावी लागत नाही.😊

 

पालक-बालक मैत्री मनापासुन जपणाऱ्या

तुला त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.😊

 

आप्तेष्टांशी मैत्रीचे नाते आनंदाने निभवणाऱ्या

तुला ओरडून सांगण्याची गरज लागत नाही.😊

 

ध्येपूर्तीसाठी अडणाऱ्यांना सल्ले देताना

तुला मार्गदर्शक म्हणून दाखवावं लागत नाही.😊

 

गरजूंना योग्य वेळी योग्य मदत करताना

तुला दानशूर म्हणून मिरवावं लागत नाही.😊

 

प्रेमासाठी भुकेल्यांना आईची माया देणाऱ्या

तुला करुणाकर म्हणून सांगावं लागत नाही.😊

– प्रेमा