😊अप्रायजल😊

कामाच्या विषयी सकारात्मकपणे जाणून घेऊन
प्रोत्साहन मिळणे म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊

केलेल्या कष्टाची पद व पगाराच्या रूपात कौतुकाची थाप
मिळणे म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊

कामाला महत्त्व देऊन उत्कृष्ट बाबींबाबत प्रशंसा
करणे म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊

कामातील सुधारणा सकारात्मक पद्धतीने
सुचवणे म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊

फक्त काम पाहून तटस्थपणे मूल्यांकन
करणे म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊

वर्षभर केलेल्या कामाचे सार्थक
म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊
– प्रेमा