काय सांगू बाई? ही पोरं काम सोडून
उठ सुठ मोबाईल हातात घेई.😐

काय सांगू बाई? अभ्यास बाजूला ठेवून
हे पोरं इंटरनेटमध्ये व्यस्त होई .😐

काय सांगू बाई? मोबाईल मध्ये डोकं घालून
यांचा मेंदू दीर्घकाळासाठी बधीर होई.😐

काय सांगू बाई? या व्यसनाच्या
नादात खान पानाकडे दुर्लक्ष होई.😐

काय सांगू बाई? मोबाईल कमी म्हणून संगतीला बिडी, तंबाखू, दारु, गांजाच्या व्यसनात पोरं व्यस्त होई.😐

काय सांगू बाई? घरातील थोरांच्या
दुर्लक्षामुळे पोराचं आयुष्य बरबाद होई.😐

काय सांगू बाई? व्यसनाच्या आहारी जाऊन
तरुण वर्ग मानसिक आजारी होई.😐

काय सांगू बाई? घरा सोबतच ही व्यसनाधीनता
आपल्या सर्व समाजाला त्रासदायक होई.😐

काय सांगू बाई? उजडल्या पासून घरात चिडचिड, ताण आणि भांडणाची रोज सुरुवात होई.😐

काय सांगू बाई? सल्ला/ मार्गदर्शन/ समुपदेशन
या व्यसनाधीन लोकांसाठी कामाला येई.😐

तरुण वर्गाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी व व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी थोडी केली पाहिजे घाई.😊

सुदृढ समाज घडण्यासाठी तरुणवर्ग बौध्दीक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे ताई.😊
– प्रेमा