साडेतीन पीठे तुझी ओळख करून देई,
भक्तांच्या हाकेला धावून येतेस तू आई.🙏

कोल्हापूरची तू महालक्ष्मी माता आई,
भक्त मंडळी तुझ्या महिमेची गाथा गाई.🙏

तुळजापूरची तू भवानी माता आई,
भक्त लोकं भक्ती भावाने तुझी भेट घेई.🙏

माहूरची तू रेणुका माता आई,
डोंगरावर बसून भक्तांना तू दर्शन देई.🙏

वणीची तू सप्तश्रृंगी माता आई,
तुझ्या दर्शनाने भक्त पावन होई.🙏

ना ना रूपे तुझी आई अंबाबाई,
तुझ्या भेटीने मन प्रसन्न होई.🙏

भोळे भक्त दुःख हारण्या येती तुझ्या पायी,
सगळ्यांना सद्बुद्धी दे तू आई अंबाबाई.🙏

नवरात्रीत तुझ्या पायी डोकं ठेवून धन्य धन्य होई,
तुझ्या प्रेमाची सावली अशीच आम्हावर राहूदे आई.🙏
– प्रेमा