मूल जन्माला यावे म्हणून आई बाबाची असणारी गडबड,
ते जन्माला आल्या नंतर त्याला वाढवतानाची धडपड.🤗
ते मोठे झाले की त्याला सांभाळण्यासाठीची पळापळ,
किशोरवय म्हणजेच त्याचा अल्लडपणा जपण्याची धावपळ.🙄
मूल फक्त आपलंच ऐकावं यासाठी होणारी घालमेल,
लग्ना नंतर ते आपल्यापासून दूर जाणार म्हणून होणारी चलबिचल.😃
पालकांचं सगळं आयुष्य कसं मुलांभवती एकवटतं,
मुलं मोठी झाली की, मग ते आयुष्यच एकटं पडतं.😅
म्हणून वेळ न घालवता स्वतःला सावरूया, भावनांना आवरूया,
वेगवेगळे छंद जोपासूया आणि आनंदाने जीवन जगुया.🤗
– प्रेमा
January 8, 2022 at 5:36 am
खरय. ही चिमणी पाखरं पंख पसरुन भुर्र उडून जातात. मग रहातो तो एकटेपणा
या चीमण्यांनो परत फीरा रे
घराकडे अपूल्या
खूप छान वास्तव.
January 8, 2022 at 5:39 am
धन्यवाद ताई.🙏😊
January 8, 2022 at 5:41 am
अगदी मस्त!!! मुला वयात आली की आई बाबां ने त्यांना मोकळा सोडला पाहिजे. ते आपली जबाबदारी स्वीकारतील ही अपेक्षा आता चुकीचेच आहे. The circle of the family has changed with the passage of time. आपण त्यांची काळजी घ्यायची आणि त्यांनी त्यांच्या मुलांची!!
January 8, 2022 at 6:01 am
अगदी बरोबर ताई.👍
Thank you.🙏😊
January 8, 2022 at 6:51 am
अगदी खरय… मुलांसाठी एवढी धडपड करून शेवटी मुलं लांबच रहातात… 👍👍👍
January 8, 2022 at 10:41 am
धन्यवाद दादा!🙏😊