महिलांनीच घर स्वच्छ ठेवण्याचा

अट्टाहास कशाला हवा,

घरातील झाडूला लागावा की

कधीतरी पुरुषाचा हात नवा.☺️

 

स्वयंपाक करून थकत

असेल की ती पण कवा कवा,

एखाद्या भाजीसाठी लागावा

की पुरुषाचा हात नवा.😊

 

ऑफिस-घर असते तारेवरची

कसरत म्हणणं असतं सोपं तवा,

प्रत्यक्षात पुरुष हे काम करून

बघताना निघते सगळी हवा.😀

 

बालसंगोपन करणे हे तिच्या

एकटीचं काम नसतं भावा,

म्हणून त्याने पण कधी तरी

त्यात झोकून द्यायचं असतं रावा.😊

 

दोघांनी मिळून घर आणि

संसार सांभाळणे खेळ नवा,

यासाठी दोघांचा पण

संगनमताने समान वाटा हवा.☺️

– प्रेमा