मी आजारी असताना तू घेणाऱ्या
काळजीतून मला तुझं प्रेम जाणवतं.🥰
मी तुझ्यासाठी सर्वस्व आहे या तुझ्या
विचारातून मला तुझं प्रेम जाणवतं.🥰
मी खुश राहावी म्हणून समानतेच्या या तुझ्या
वागण्यातून मला तुझं प्रेम जाणवतं.🥰
मी सतत तुझ्या सोबत असावी या तुझ्या
बोलण्यातून मला तुझं प्रेम जाणवतं.🥰
मी तुझाच आहे या तुझ्या
विश्वासातून मला तुझं प्रेम जाणवतं.🥰
माझी नाराजी दूर करण्यासाठी तू केलेल्या
चेष्टेतून मला तुझं प्रेम जाणवतं.🥰
मी आनंदी असावी यासाठी तू केलेल्या
धडपडीतून मला तुझं प्रेम जाणवतं.🥰
मी नासमज आहे म्हणून या तुझ्या समजून
घेण्यातून मला तुझं प्रेम जाणवतं.🥰
– प्रेमा
January 7, 2022 at 3:59 am
खूप छान…. प्रेम हे बोलून दाखवायची गरजच नसावी, ते जाणवतंच अशा लहानसहान गोष्टीतून…. आणी तेच खरं समजूतदार प्रेम असतं 👍👍👍
January 7, 2022 at 5:04 am
हो दादा.
मनापासुन धन्यवाद!🙏😊
January 7, 2022 at 4:02 am
खूप छान…. प्रेम हे बोलून दाखवायची गरजच नसावी, ते जाणवतंच अशा लहानसहान गोष्टीतून…. आणी तेचखरं समजूतदार प्रेम असतं 👍👍👍
January 7, 2022 at 5:42 am
Love is something to be felt and that is true love.
January 7, 2022 at 10:55 am
Yes.😊
Thank you Tai.🙏😊