माझं सावली बनून सतत तुझ्या सोबत

असणं तू विसरू शकणार नाहीस.🥰

 

प्रेमाचा विश्वास देण्यासाठी माझी घेतलेली

शपथ तू विसरू शकणार नाहीस.☺️

 

मी फक्त तुझीच आहे हा दिलेला

विश्वास तू विसरू शकणार नाहीस.🥰

 

सारी दुनिया विसरून माझ्या सोबत केलेल्या

प्रेमाच्या गप्पा तू विसरू शकणार नाहीस.☺️

 

माझी सोबत मिळवण्यासाठी केलेल्या

आश्वासक गोष्टी तू विसरू शकणार नाहीस.🥰

 

सोबत फिरताना नकळत झालेला माझा

प्रेमळ स्पर्श तू विसरू शकणार नाहीस.☺️

 

प्रेमाची सवय झालेली ती एकांताची

जागा तू विसरू शकणार नाहीस.🥰

 

माझं ते वेड लावणारं निस्वार्थी

प्रेम तू विसरू शकणार नाहीस.☺️

– प्रेमा