हे निर्मात्या या वर्षी तरी
कोरोनाची बिकट वाट नको,
आता तुला जमेल तशी
रोज नवी निरोगी पहाट दे.🤗
हे करुणाकरा या वर्षी तरी
दुःखाची वेळ नको,
आता तुला जमेल तशी
रोज नव्या उमेदीची साथ दे.🤗
हे ईश्वरा या वर्षी तरी
नकारात्मक दिवस नको,
आता तुला जमेल तशी
रोज जगण्याची नवी जिद्द दे.🤗
हे विधात्या या वर्षी तरी
वाईट काळ नको,
आता तुला जमेल तशी
रोज नव्या संधीची वाट दे.🤗
हे सृष्टीकरा या वर्षी तरी
पर्यावरण ऱ्हास नको,
आता तुला जमेल तशी
रोज नव्या विचारांची आस दे.🤗
हे परमेश्वरा या वर्षी तरी
दुःखी जीवांचा आक्रोश नको,
आता तुला जमेल तशी
रोज नवी शांततेची रात्र दे.🤗
हे विश्वकर्ता या वर्षी तरी
जनतेची एकांतात दशा नको,
आता तुला जमेल तशी
रोज नवी प्रेमाची भाषा दे.🤗
– प्रेमा
January 2, 2022 at 11:57 am
अप्रतिम
January 2, 2022 at 12:03 pm
धन्यवाद!🙏😊
January 2, 2022 at 12:51 pm
Kyaaa baat hai 👍👍👍
सगळ्या लोकांची हीच आणी अशीच मागणी असेल देवाकडे…. खूप सुंदर प्रार्थना 👍👍👍🙏🏼
January 2, 2022 at 2:09 pm
धन्यवाद दादा.🙏☺️
January 2, 2022 at 2:25 pm
नक्कीच. तथास्तू. जो जे वांछील तो ते लाहो. छानच
January 2, 2022 at 3:54 pm
धन्यवाद ताई.🙏☺️