जुनं वर्ष जाताना आठवणींना उजाळा देतं.

येणारं नवीन वर्ष जीवनाला नवीन दिशा देतं..

जाणारं वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातं…😊

जुनं ते विसरून पुढे चालायचं असतं.

नवीन गोष्टींना प्राधान्य द्यायचं असतं..

जाणारं वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातं…😊

जाणाऱ्याला थांबवायचं नसतं.

येणाऱ्याला अडवायचं नसतं..

जाणारं वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातं…😊

जीवनातील चढउतारांना सामोरं जायचं असतं.

नवनवीन होणाऱ्या बदलला स्वीकारायचं असतं..

जाणारं वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातं…😊

होऊन गेलेलं सगळं भूतकाळात जातं.

येणारं नवीन वर्ष भविष्यात रमून जातं..

जाणारं वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातं…😊

नकारात्मक विचारांपासून दूर राहायचं असतं.

सकारात्मक विचारांन सोबत जायचं असतं..

जाणारं वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातं…😊

संयमाने जीवनातील दुःखांना दूर सारता येतं.

प्रयत्नपूर्वक सुखांना आपल्या जवळ करता येतं..

जाणारं वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातं…😊

संकटाने खचून न जाता त्यातून शिकायचं असतं.

सुखाने भारावून न जाता स्वत्व जपायचं असतं..

जाणारं वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातं…😊

– प्रेमा