समोरच्याच्या मनातील भाव जाणून घेऊन योग्य शब्दात मांडणं मला जमतं, कसं ते माहिती नाही.😀
शब्द न शब्द माझाच आहे असे समोरच्याला वाटण्या इतपत लिखाण होतं, कसं ते माहिती नाही.☺️
मिञ मंडळींना अनेक शुभेच्छा देताना त्यांना
ओळीतून प्रकट करते, कसं ते माहिती नाही.🤩
काय यार खरंच माझ्या मनीचे बोल बोलत आहेस असे समोरून प्रतिक्रिया येतात, कसं ते माहिती नाही.☺️
लॉकडाऊनमध्ये माझ्यातील नवीन प्रतिभा मला उमगली तिचे उपकार मानू कसं ते माहिती नाही.🥰
सगळ्यांपासून चार हात लांब असूनही
प्रेमा मनकवडी वाटते, कसं ते माहिती नाही.😀
– प्रेमा
December 30, 2021 at 2:27 pm
I cannot express my wonder at how you can read my mind. Mazhya ver tu don kavita lihilya and mazhe manatle bhav tantotant vykta kele.
December 30, 2021 at 5:01 pm
मनापासुन धन्यवाद ताई.🙏🥰