त्याला मिसरडू फुटण्या आधीच त्याचा बाप देवाघरी जातो,

हसण्या खेळण्याच्या वयात घराचा भार अचानक त्याच्यावर येतो.

घरात चार पाच तोंडं खाणारी म्हणून माय धाय मोकलून रडते,

आपल्या आईला त्रास नको म्हणून हे मूल कामाच्या आहारी पडते.

स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तो दिवस रात्र एक करतो,

न डगमगता तो आपल्या घराची जबाबदारी अवलिया पेलतो.

मुलगा असा हा स्वकर्तृत्वावर स्वाभिमानाने मोठा होणारा,

कौतुक करणार त्याचे गावातील प्रत्येक येणारा जाणारा.

सरकारनी कायदा केला बालमजुरी थांबवण्याचा,

पण पर्याय नाही दिला भुकी कुटुंब सावरण्याचा.

इवलेसे शरीर घेऊन काम करणारे हे दोन हात,

त्रास सोसत उद्यासाठीचे मोठे स्वप्न मनी बाळगतात.

मग कोण होतो कलेक्टर तर कोण तहसीलदार,

स्वप्न प्रत्यक्षात उतरवयात हे घेत नाहीत माघार.

– प्रेमा