तू काही केलं तरी किंवा काही नाही केलं तरी लोकं काहीतरी म्हणतील;
मग विचार का करायचा की लोकं काय म्हणतील?
तू विचार मांडले तरी किंवा काही नाही बोललं तरी लोकं काहीतरी म्हणतील;
मग विचार का करायचा की लोकं काय म्हणतील?
तू स्वच्छंदी वागलं तरी किंवा मन मारून जगलं तरी लोकं काहीतरी म्हणतील;
मग विचार का करायचा की लोकं काय म्हणतील?
तू नातेसंबंध जपले तरी किंवा नात्यांना फाटा दिला तरी लोकं काहीतरी म्हणतील;
मग विचार का करायचा की लोकं काय म्हणतील?
तू आनंदी राहिलं तरी किंवा दुःखी राहिलं तरी लोकं काहीतरी म्हणतील;
मग विचार का करायचा की लोकं काय म्हणतील?
तू लोकांची मने जिंकली किंवा स्वतः झुरला तरी लोकं काहीतरी म्हणतील;
मग विचार का करायचा की लोकं काय म्हणतील?
तुझ्या वागण्याची कारणं तुला माहिती, तुझे आयुष्य तुलाच माहिती; म्हणून विचार करणं सोडून दे वेड्या मना की लोकं काय म्हणतील.
– प्रेमा
November 23, 2021 at 4:19 am
कुछ तो लोग कहेंगे,लोगो का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों को……
So well written, this has been my policy for the last twenty years!
November 23, 2021 at 4:25 am
Good Tai.
Thank you.🙏😊
November 23, 2021 at 11:44 am
Tymule Kon kai Mhanal tari … Me mala je vatat te karto 🌷🌷😂😂😂😂
November 23, 2021 at 4:47 pm
Very Good.👍
Thank you.🙏😊